

एकीकडे जंगी पार्टी करून वाढदिवस साजरे केले जात असताना या क्रिकेटपटूनं मात्र वाढदिवशी शाळांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. (Suresh Raina/Instagram)


नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला क्रिकेटपटू सुरेश रैनानं उत्तर प्रदेश, जम्मू आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) मधील 34 शाळांमध्ये शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याचा संकल्प केला आहे. (Suresh Raina/Instagram)


15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रैना आपल्या मुलीच्या नावावर सुरू केलेल्या ग्रेसिया रैना फाउंडेशन (GRF) या स्वयंसेवी संस्थेसाठी काम करता. या संस्थेच्या मदतीनं रैना आपल्या वाढदिवशी म्हणजेच 27 नोव्हेंबरला 34 शाळांमध्ये शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची सोय करून देणार आहे. (Suresh Raina/Instagram)


रैनानं जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या उपक्रमामुळे या शाळांमध्ये शिकणार्या 10,000 हून अधिक मुलांना आरोग्य आणि स्वच्छताविषयक सुविधा मिळतील. (Suresh Raina/Instagram)


या फाऊंडेशनची सहसंस्थापक असलेल्या त्याच्या पत्नी प्रियंकानं तिच्या वाढदिवशी गाझियाबादमधील एका शाळेत पाण्याची सोय करून दिली होती. तसेच, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, हात धुणे, भांडी धुण्याचे काम सुरू केले. (Suresh Raina/Instagram)