भारताचा क्रिकेटपटू जोगिंदर शर्माने वयाच्या ३९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. त्याने धोनीसोबतच क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
2/ 6
एकदिवसीय क्रिकेटमध्ये जोगिंदर शर्माने भारताकडून २००४ मध्ये पदार्पण केलं होतं. त्याच सामन्यात धोनीसुद्धा पहिल्यांदाच भारताकडून मैदानात उतरला होता.
3/ 6
पहिल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये २००७ साली भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. त्यात अखेरचं षटक टाकण्यासाठी एमएस धोनीने जोगिंदर शर्माच्या हाती चेंडू सोपवला होता.
4/ 6
२००७ मध्ये जोगिंदर शर्माने टी२० वर्ल्ड कपमध्ये मिसबाह उल हकला अंतिम षटक टाकलं होतं. जोगिंदर शर्माने धोनीने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत जबरदस्त गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला होता.
5/ 6
जोगिंदर शर्माला भारताकडून फक्त ४ एकदिवसीय आणि ४ टी२० सामने खेळण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे चारही सामने टी२० वर्ल्ड कपमधील होते.
6/ 6
सध्या हरियाणा पोलिसात तो डीएसपी पदावर कार्यरत आहे. कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल त्याचं आयसीसीने कौतुकही केलं होतं.