मुंबई, 26 जानेवारी : टीम इंडियाला दोन वेळा वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून देणारा युवराज सिंह (Yuvraj Singh) बाबा झाला आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री हेजलनं मुलाला जन्म दिला आहे. युवराज आणि हेजल यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न केले होते. त्यापूर्वी युवराजनं बराच काळ अभिनेत्री किम शर्माला (Kim Sharma) डेट केले आहे.
युवराजची पत्नी हेजलचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. तिथेत ती मोठी झालाी. हेजलनं हॅरी पॉटर सीरिजमधील तीन भागांमध्ये काम केले आहे. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये आली. सलमान खानचा सिनेमा बॉडीगार्डमुळे तिला ओळख मिळाली. या सिनेमात तिने करिना कपूरच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. हेजल बिग बॉस स्पर्धेतही सहभागी झाली होती.
युवराजचं हेजलवर खूप प्रेम होतं. युवीनं हेजलसाठी एका मुलाला देखील धमकावले होते. त्याला फेसबुकवरून त्या मुलाची माहिती मिळाली होती, हेजलपासून दूर राहा, मी हेजलशी लग्न करणार आहे, असे युवराजने सांगितले होते. हेजलनं युवराजची फ्रेंड रिक्वेस्ट 3 महिन्यांनी स्वीकारली होती. त्यानंतर दोघांमध्ये भेटी सुरू झाल्या.