

भारताने आस्ट्रेलियाविरुद्धचा अॅडलेडच्या मैदानावर खेळण्यात दुसरा एकदिवसीय सामना ६ गडी राखून जिंकला. विराट कोहलीनं या सामन्यात 104 धावांची शतकी खेळी केली.


विराट कोहलीचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 64वे शतक आहे. सर्वाधिक शतक करणाऱ्यांमध्ये कोहली जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. पहिल्या नंबरवर सचिन तेंडुलकर (100 शतके) आणि दुसऱ्या नंबरवर रिकी पाँटिंग (71 शतके) दुसऱ्या स्थानावर आहे.


कोहलीचं हे 39 वे एकदिवसीय शतक आहे. पहिल्या वनडेत कोहली लवकर बाद झाला होता. दुसऱ्या वनडेतील शतकामुळे विराटच्या नावावर काही विक्रम जमा झाले आहेत.


प्रतिस्पर्धी संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कोहलीचं हे 24 वे शतक आहे. तसंही याआधीच त्यानं नंबर एक पटकावला आहे. त्याच्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 17 शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे.


परदेशात खेळलेल्या एकदिवसीय सामन्यांत कोहलीचं हे २२ वे शतक आहे. याबाबत त्यानं श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि सनथ जयसुर्या यांना मागं टाकलं आहे. त्या दोघांचीही 21 शतकं आहेत. यामध्ये विराटच्या आधी सचिन तेंडुलकरचा नंबर लागतो. सचिनने परदेशी भूमीवर 29 शतके केली आहेत.