भारतीय महिला आणि पुरुष टीम (Team India Mens and Team India Womens) बुधवारी इंग्लंडला एकत्र रवाना झाल्या. (फोटो -BCCI) टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजचा हा पहिलाच इंग्लंड दौरा आहे. ( फोटो BCCI) अनुभवी इशांत शर्माची भूमिका या दौऱ्यात महत्त्वाची ठरणार आहे. ( फोटो BCCI) विमानाची वाट पाहत असलेल्या मयंग अग्रवालला इंग्लंड दौऱ्यातही संधी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ( फोटो - BCCI) ऑपरेशननंतर पूर्ण बरा झालेला केएल राहुल इंग्लंड दौऱ्याला रवाना झाला आहे. ( फोटो BCCI) विराट कोहलीच्या शतकाची प्रतीक्षा इंग्लंड दौऱ्यात संपणार का? याची फॅन्सना मोठी उत्सुकता आहे. (फोटो BCCI) भारतीय महिला टीम इंग्लंडमध्ये टेस्ट मॅच खेळणार आहे. या टेस्टमध्ये कॅप्टन मिताली राजवर मोठी भिस्त असेल. (फोटो BCCI) हिट मॅन रोहित शर्माची बॅट तळपली तर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात ऐतिहासिक विजय मिळवणार हे नक्की आहे. (फोटो - BCCI)