मुंबई, 28 ऑगस्ट : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याच्यापूर्वी आरसीबी (RCB) आणि विराट कोहलीसाठी (Virat Kohli) चांगली बातमी आहे. आरसीबीच्या टीममधील नवा खेळाडू टीम डेव्हिडनं (Tim David) कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL 2021) पदार्पणातच कमाल केली आहे. डेव्हिडचा न्यूझीलंडच्या फिन एलनच्या जागी आरसीबीमध्ये समावेश केला आहे. आयपीएल स्पर्धेसाठी निवड झालेला तो सिंगापूरचा पहिला खेळाडू आहे. (Photo: RCB)