मुंबई, 9 सप्टेंबर : टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) टीम इंडियाचा मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2007 साली धोनीच्याच नेतृत्वात भारताने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. याचसह 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीही भारताने धोनीच्याच नेतृत्वात जिंकली. यानंतर मात्र भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. आता पुन्हा एकदा धोनीची टीममध्ये एण्ट्री झाल्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.