मुंबई, 20 ऑगस्ट: क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) सध्या दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडलं आहे. एकीकडं टीमचं प्रदर्शन सातत्यानं घसरत आहे. त्याचवेळी कोच आणि खेळाडूमध्ये मतभेद झाल्याचं वृत्त आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा कोच जस्टीन लँगरवर (Justin Langer) तयार होत असलेल्या डॉक्यूमेंट्रीसाठी खेळाडूंना जास्त पैसे मिळत असल्यानं खेळाडू आणि कोचमध्ये वाद निर्माण झाला आहे. (फोटो: AP)
या डॉक्युमेंट्रीमध्ये 2018 साली पाकिस्तान विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये जस्टीन लँगर आणि उस्मान ख्वाज यांच्यात झालेल्या मतभेदाला दाखवण्यात आलं आहे. कोच आणि खेळाडूमधील मतभेदाचं हे पहिलं उदाहरण आहे. लँगरच्या वागणुकीवर वरिष्ठ खेळाडू नाराज असल्याचं वृत्त यापूर्वी आले होते. (फोटो: Cricket Australia Twitter)
ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी हे वर्ष निराशाजनक ठरलं आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेशनं त्यांचा टी20 सीरिजमध्ये पराभव केला आहे. त्यापूर्वी टीम इंडियाविरुद्ध मायदेशात त्यांनी टेस्ट सीरिज 1-2 नं गमावली होती. आता पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपपूर्वी नवे मतभेद उघड झाल्यानं क्रिकेट ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली आहे. (फोटो: AFP)