मुंबई, 9 सप्टेंबर : पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये मुंबई इंडियन्सचा विकेट किपर इशान किशनचा समावेश करण्यात आला आहे. 23 वर्षांच्या इशाननं कमी काळात आक्रमक खेळाच्या जोरावर सर्वांना प्रभावित केलंय. इशानची टीममध्ये निवड होताच फॅशन मॉडल आदिती हुंदिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Aditi Hundia, Ishan Kishan/Instagram)
इशाननं देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगला ठसा उमटवला आहे. तसंच तो टीम इंडियाकडूनही खेळला आहे. आता वर्ल्ड कपसाठी त्याची निवड झाल्यानंतर त्याचं आयुष्य आणि लव्ह लाईफबद्दल लोकांना उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे आदिती हुंदिया चर्चेत आहे. आदिती ही इशानची गर्लफ्रेंड मानली जाते. या रिलेशनशिपबद्दल इशान किंवा आदितीनं अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण इशान किशनच्या चांगल्या खेळीनंतर आदिती त्याचे फोटो शेअर करत असते त्यामुळे फॅन्स याबाबत अंदाज करत आहेत. (Aditi Hundia/Instagram)