टीम इंडियाचा कॅप्टन सौरव गांगुली (Sourav Ganguly) आज 49 वर्षांचा झाला आहे. भारतीय क्रिकेटमधील मोठ्या बदलांचं श्रेय गांगुलीला जातं. तो टीम इंडियाचा एक यशस्वी कॅप्टन आणि आक्रमक बॅट्समन होता. त्याने टेस्टमध्ये 16 आणि वन-डेमध्ये 22 शतक झळकावली आहेत. गांगुलीचं लग्न अगदी फिल्मी स्टाईलनं झालं. त्याने गर्लफ्रेंड डोनासोबत घरातून पळून जाऊन लग्न केले होते. (Dona Ganguly Instagram)
सौरव आणि डोनाचं लग्न देखील अगदी फिल्मी स्टाईलनं झालं. दोन्ही परिवारामध्ये वैर होतं. त्यामुळे 1996 साली गांगुली इंग्लंड दौऱ्याहून परतल्यानंतर दोघांनी घरातून पळून जात लग्न केलं. एका मित्राच्या मदतीनं 12 ऑगस्ट 1996 रोजी हे कोर्ट मॅरेज झालं. काही दिवसांनी दोघांच्या घरच्यांना ही माहिती समजली. त्यावेळी सुरुवातीला मोठा गोंधळ झाला. त्यानंतर त्यांचा विरोध मावळला. अखेर 21 फेब्रुवारी 1997 रोजी पुन्हा एकदा सर्व धार्मिक विधींसह त्यांचे लग्न झाले. (Dona Ganguly Instagram)