भारताविरुद्ध होणाऱ्या WTC फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूने केले लग्न
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ऐतिहासिक फायनल (WTC) होणार आहे. या फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूने लग्न केले आहे.
मुंबई, 23 मे : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ऐतिहासिक फायनल (WTC) होणार आहे. या फायनलपूर्वी न्यूझीलंडचा क्रिकेटपटू हेन्री निकोल्स याने लग्न केले आहे. (Henry Nicholls Instagram)
2/ 4
18 जून ते 22 जून या दरम्यान इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे.त्यापूर्वी न्यूझीलंडचा टीमचा महत्त्वाचा सदस्य असलेल्या हेन्रीनं फॅन्सना ही आनंदाची बातमी दिली आहे. (Henry Nicholls instagram)
3/ 4
हेन्रीनं रविवारी इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करत लग्नाची बातमी शेअर केली. हेन्रीनं त्याची गर्लफ्रेंड लूसीबरोबर लग्न केले आहे. त्याचा फोटो त्याने शेअर केला असून त्याला मिस्टर अँड मिसेस निकोल्स असं कॅप्शन दिलं आहे. (Henry Nicholls instagram )
4/ 4
29 वर्षांच्या हेन्रीनं 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 37 टेस्ट, 52 वन-डे आणि 5 टी 20 मॅचमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने टेस्टमध्ये 2152, वन-डे मध्ये 1409 तर टी 20 मध्ये 19 रन काढले आहेत.