मुंबई, 22 मे : ‘माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये महेंद्रसिंह धोनी होता. त्यामुळे तो असेपर्यंत मला टीम इंडियात फार संधी मिळाली नाही, असे मत टीम इंडियाचा विकेटकिपर ऋद्धीमान साहा याने व्यक्त केले आहे. साहाने 2010 साली टीम इंडियाकडून पदार्पण केले. तो 2010 ते 2014 या काळात फक्त दोन टेस्ट खेळला. या काळात टीम इंडियामध्ये 'धोनी'यूग होते. त्यामुळे त्याला नियमित संधी मिळाली नाही.
पार्थिव पटेलने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पार्थिव त्या काळात टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज होता. पण 2004 मध्ये खराब विकेटकीपिंगमुळे त्याला संघातून वगळण्यात आलं. यानंतर दिनेश कार्तिक आणि त्यानंतर महेंद्रसिंह धोनी यांनी पार्थिव पटेलच्या परतीच्या आशा संपवल्या.
2004 मध्ये पार्थिव पटेलची जागा घेणारा दिनेश कार्तिक याला काही मॅचनंतरच विकेटकीपर बनण्याची संधी मिळाली होती. त्याने काही सामन्यांत चांगली खेळी केली. धोनीच्या एंट्रीनंतर तोही गायब झाला. 2008 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात त्याला पुन्हा संधी मिळाली. मात्र त्यानंतरही तो टीममध्ये दीर्घकाळ जागा टिकवून ठेवू शकला नाही.
बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळलेल्या दीप दासगुप्तालाही केवळ 8 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. 2001 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दासगुप्ताची आंतरराष्ट्रीय कारकीर्द एकाच वर्षात संपली.यानंतर तो देशांतर्गत क्रिकेट खेळत होता.धोनीमुळेच निवड समितीने त्याचा पुन्हा विचार केला नाही, अशी चर्चा होती.