मुंबई, 28 जून : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) सोशल मीडियावर सतत सक्रीय नसतो. 39 वर्षांचा धोनी त्याच्या कुटंबासोबतच बहुतेक वेळ घालवतो. तसंच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर मीडियापासून दूर आहे. असं असलं तरी धोनीची लोकप्रियता, त्याच्याबद्दलची उत्सुकता कमी झालेली नाही.