

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिले तीन सामने जिंकून मालिका विजय साजरा केला आहे. 2009 नंतर भारताने पहिल्यांदा न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकली.


भारताला मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. यात भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीने चमकदार कामगिरी केली. त्याने तिसऱ्या सामन्यात 9 षटकांत 41 धावा देत तीन गडी बाद केले.


तिसऱ्या सामन्यात शमीने सामनावीरचा पुरस्कार पटकावला. त्याला पहिल्या सामन्यातही सामनावीर पुरस्कार मिळाला होता.


दोन्ही सामनावीर पुरस्कार स्वीकारताना शमीसोबत कर्णधार विराट कोहला होता. तिसऱ्या सामन्यात पुरस्कार स्वीकारल्यानंतर शमीला प्रेझेंटर सायमल डूलने गोलंदाजीवरून प्रश्न विचारला तेव्हा कोहलीने शमीला उत्तर देण्यास सांगितले.


हवेच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी करणं कठिण असतं. पण एका गोलंदाजाला हे करावंच लागतं. तसेच दुसऱ्या बाजुला भुवनेश्वर कुमार असल्यानं खूप मदत होते असं मोहम्मद शमीने इंग्रजीत सांगितल.


त्यानंतर प्रेझेंटर सायमल डूल शमीच्या या उत्तरावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देताना युवर इंग्लिश बहोत अच्छा असं म्हटलं.