वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी संघ जाहीर केला. याआधी झालेल्या बैठकीला कर्णधार विराट कोहली उपस्थित होता. वेस्ट इंडीज दौऱ्यावर सलामीवीर शिखर धवनचे पुनरागमन झाले आहे तर कसोटी संघात यष्टीरक्षक वृद्धीमान साहा परतला आहे.
मयंक अग्रवालच्या निवडीवरून त्यावेळी अनेकांनी संघाकडे इतर पर्याय नव्हते का? असे प्रश्न विचारले होते. आता वर्ल्ड कपच्या संघात निवड झालेल्या मयंकला विंडीज दौऱ्यातून वगळले आहे. त्याबद्दल एमएसके प्रसाद यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी सांगितले की, कोणतीही मालिका किंवा मोठ्या स्पर्धेदरम्यान आम्ही पत्रकार परिषद घेत नाही. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात होते.