फक्त पार्थिव पटेल नाही तर या 5 क्रिकेटपटूंच्या करिअरला MS धोनीमुळे लागला ब्रेक
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएमस धोनी (MS Dhoni)ने 23 डिसेंबर 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक युवा खेळाडूंच्या आशा संपुष्टात आल्याचं बोललं जातं. धोनीवर असा आरोप केला जातो की त्याच्यामुळे अनेक खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळाली नाही.


वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पार्थिव पटेलने (Parthiv Patel) बुधवारी निवृत्तीची घोषणा केली. 8 ऑगस्ट 2002 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणारा पार्थिव त्या काळात टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज होता. पण 2004 मध्ये खराब विकेटकीपिंगमुळे त्याला संघातून वगळण्यात आलं. यानंतर दिनेश कार्तिक आणि त्यानंतर एमएस धोनी (एमएस धोनी) यांनी पार्थिव पटेलच्या परतीच्या आशा संपवल्या. धोनीच्या 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याच्यामुळे दुसऱ्या विकेटकिपरला संधी मिळाली नाही असा आरोप केला जातो


2004 मध्ये पार्थिव पटेलची जागा घेणारा दिनेश कार्तिक याला काही मॅचनंतरच विकेटकीपर बनण्याची संधी मिळाली होती. त्याने काही सामन्यांत चांगली खेळी केली. मात्र धोनीच्या एंट्रीनंतर तोही गायब झाला. 2008 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात त्याची वापसी झाली मात्र त्यानंतर बऱ्याचदा त्याच्याबाबतीत आत-बाहेर सुरू होतं.


2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रिद्धिमान शाह यालाही धोनी संघात असताना फारशी संधी मिळाली नव्हती. 2010 मध्ये शेवटच्या क्षणी रोहितच्या दुखापतीमुळे त्याला फलंदाज म्हणून संघात स्थान मिळाले. पण धोनी असताना त्याला विशेष संधी मिळाली नाहीत. 2014 मध्ये धोनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती झाल्यानंतर त्याला संधी मिळाली होती. 2010 पासून घरगुती क्रिकेट खेळत आहे.


बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळलेल्या दीप दासगुप्तालाही केवळ 8 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. 2001 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दासगुप्ताची आंतरराष्ट्रीय कारकीर्द एकाच वर्षात संपली. यानंतर तो देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. अशी चर्चा होती की, धोनी संघात असताना निवड समितीने त्याच्या नावाचा विचार केला नाही.


2020 मध्ये अजय रात्राने जेव्हा कसोटी शतक झळकावलं होतं, त्यावेळी अशी खेळी करणारा तो भारताचा दुसरा तरुण फलंदाज होता. पण पार्थिव पटेलच्या पदार्पणानंतर त्याचं नाव कापलं गेलं. त्यानंतर राहुल द्रविडने स्वत: विकेटकीपिंगची जबाबदारी स्वीकारली. धोनीने येण्याने रात्रा याची संधी कायमची हुकली