Home » photogallery » sport » CRICKET IPL 2022 KL RAHUL SCORED MORE THAN 590 RUNS IN IPL FOR THE 5TH CONSECUTIVE YEAR RCB BEAT LSG IN ELIMINATOR MHOD
IPL 2022: राहुल टॉपवर पण टीम आऊट, सलग पाचव्या वर्षी परंपरा कायम!
आयपीएल स्पर्धेत केएल रा्हुलनं (KL Rahul) भरपूर रन केल्यानंतरही त्याची टीम आऊट झाली आहे. एलिमेनेटर मॅचमध्ये आरसीबीनं लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करत राहुलला रिकाम्या हाती परत पाठवलं आहे.
|
1/ 6
मुंबई, 26 मे : आयपीएल स्पर्धेत केएल राहुलचा (KL Rahul) दबदबा कायम आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन असलेल्या राहुलनं या सिझनमधील (IPL 2022) 15 सामन्यांत 2 शतकांच्या मदतीनं 616 रन केले. त्यानंतरही त्याचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न संपुष्टात आलं. . (PTI)
2/ 6
राहुलनं 2018 ते 2022 ही सलग पाच वर्ष प्रत्येक सिझनमध्ये 590 पेक्षा जास्त रन काढले आहेत. राहुलनं 2018 साली 659 रन केले होते. 2019 साली 513, 2020 साली 670 आणि 2021 साली 626 रन केले. (PIC-Instagram)
3/ 6
राहुल 2018 ते 2021 या कालावधीमध्ये पंजाब किंग्जकडून खेळला. या काळातील प्रत्येक वर्षी राहुलनं पंजाबकडून सर्वात जास्त रन केले. पण, तो पंजाबला एकदाही 'प्ले ऑफ' मध्ये नेऊ शकला नाही. (LSG/Instagram)
4/ 6
या सिझनमध्ये राहुल लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन होता. लखनऊचा हा पहिलाच आयपीएल सिझन आहे. त्यानं लखनऊकडूनही सर्वाधिक रन करत 2 शतक झळकावली. पण, त्याची टीम एलिमेनेटरमधूनच बाहेर पडली. (PTI)
5/ 6
आयपीएल 2022 मधील पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. (PC-Rajasthan Royals Instagram)
6/ 6
दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जिंकणाऱ्या टीमची लढत फायनलमध्ये गुजरात टायटन्सशी होईल. (IPL Instagram)