ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मदतीसाठी सोनू सूद सज्ज, Social Media वर दिलं मजेशीर उत्तर
सोशल मीडियावर (Social Media) एका युझरनं एक कार्टून पोस्ट केलंय. त्यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू (Australian Player) घरी जाण्यासाठी सोनू सूदची मदत मागत आहेत.
मुंबई, 8 मे : आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोनामुळे स्थगित करावी लागली. त्यानंतर खेळाडू घरी परतत आहेत. विदेशी खेळाडूंना घरी परतण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू तर अजूनही घरी परतले नाहीत. (फोटो: Instagram/sonu_sood)
2/ 5
काही ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतामध्येच थांबले आहेत. तर काही 15 मे पर्यंत असलेली बंदी संपेपर्यंत मालदिवला रवाना झाले आहेत.यावेळी अभिनेते सोनू सूद यानं ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसाठी एक मजेशीर ट्विट केलं आहे.
3/ 5
सोशल मीडियावर एका युझरनं एक कार्टून पोस्ट केलंय. त्यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू घरी जाण्यासाठी सोनू सूदची मदत मागत आहेत. या पोस्टला सोनूनं मजेदार उत्तर दिलं आहे. “त्यांना तातडीनं सामान बांधायला सांगा” असं उत्तर सोनूनं दिलं आहे.
4/ 5
कोरोना महामारीच्या या संकटकाळामध्ये सोनू सूदनं मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यानं माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) याला मदत केली होती.
5/ 5
सुरेश रैनाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यांच्यासाठी तातडीनं ऑक्सिजनची आवश्यकता होता. सोनू सूदला हे समजताच त्यांनी 10 मिनिटांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर देण्याचं रैनाला आश्वासन दिलं. (PTI)