चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)चा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni)2008 पासून आयपीएल (IPL)खेळत आहे. प्रत्येक टीमच्या बॉलरची एमएस धोनीने या 12 वर्षांमध्ये धुलाई केली. आपल्या बॅटिंगमुळे धोनीने चेन्नईला अनेक मॅचही जिंकवल्या. 39 व्या वर्षी धोनी चेन्नईचा सगळ्यात मोठा मॅच विनर नसेल, पण आयपीएलमध्ये अनेक वर्ष त्याने आपला करिश्मा दाखवला. आयपीएलमध्ये सगळे मोसम खेळणाऱ्या धोनीला एका बॉलरविरुद्ध एकही फोर किंवा सिक्स मारता आलेला नाही. (फोटो- IPL/BCCI)