

आयपीएलमध्ये आतापर्यंत 17 गोलंदाजांनी हॅटट्रिक केली आहे. यात 12 गोलंदाजांनी एकवेळा हॅट्ट्रिक केली आहे.


आयपीएलमध्ये पहिली हॅट्ट्रिक भारताचा माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपति बालाजीच्या नावावर आहे. त्याने 2008 मध्ये सीएसकेकडून खेळताना किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ही कामगिरी केली होती.


अमित मिश्राने 2008 मध्ये डेक्कन चार्जर्स, 2011 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि 2013 मध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध खेळताना हॅट्ट्रिक केली होती.


युवराज सिंगने 2009 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि डेक्कन चार्जर्सविरुद्ध हॅट्ट्रिक करण्याची कामगिरी केली होती.


आयपीएल 2019 ला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक फ्रॅचाइजी आपल्या संघावर लक्ष देत आहे. यात तीनवेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई संघावर प्रत्येकाची नजर आहे.


इंडियाविन स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडकडे मुंबई इंडियन्सची मालकी आहे. आतापर्यंत या संघाने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2008, 2009, 2016 आणि 2018 मध्ये ग्रुपमध्ये, 2011, 2012, 2014 ला प्ले ऑफमध्ये आणि 2010 ला उपविजेतेपदापर्यंत मुंबई इंडियन्सने धडक मारली होती. तर 2013, 2015, 2017 मध्ये विजेतेपद पटकावले होते.


रिकी पाँटिंगनंतर कर्णधार म्हणून 2013 मध्ये रोहित शर्माकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली तीन वेळा विजेतेपद पटकावण्याची कामगिरी संघाने केले. असे करणारा चेन्नई नंतर मुंबई हा दुसरा संघ आहे. मुंबई इंडियन्सने 2008 पासून आतापर्यंत 171 सामने खेळले असून त्यात 97 विजय तर 73 पराभव पत्करले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला.


आता मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी श्रीलंकेचा फलंदाज माहेला जयवर्धने आहे. संघात कर्णधार रोहित शर्मा शिवाय युवराज सिंग, क्विंटन डि कॉक, जसप्रीत बुमराह, कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या, केरॉन पोलॉर्ड, लसिथ मलिंगा हे स्टार खेळाडू आहेत.


जयपूरमध्ये झालेल्या लिलावात अनेख खेळाडूंना परत संघात घेतले. युवराज सिंगला खरेदी करून मुंबईने सर्वांनाच धक्का दिला आहे. याशिवाय मलिंगाला संघात घेण्यामध्ये मुंबई यशस्वी ठरले. यांच्याशिवाय अनमोलप्रीत सिंग आणि बरिंदर सरन यांना 3.4 कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले. तर राशिक डार आणि पंकज जयस्वाल यांनाही लिलावात घेतले आहे.


भारतीय संघात सलामीला खेळणारा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळतो. हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या आणि पोलार्ड हे मधल्या फळीत फलंदाजी करतात. सलामीला क्विंटन डी कॉक आणि इविन लुइस यांच्यासह एक भारतीय खेळाडू उतरू शकतो. यात युवराज सिंग आणि पंकज जयस्वालही संघाची ताकद ठरू शकतात. फिरकीपटू मयंक मार्कंडेयचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल.


ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्याच कसोटीत दुखापतग्रस्त झालेला भारताचा युवा खेळाडू आता आयपीएलमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी पृथ्वी शॉबद्दल वेगवेगळ्या चर्चा माध्यमातून केल्या जात होत्या. यात त्याच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. मात्र आता त्या आरोपांना पृथ्वी शॉने फेटाळून लावले आहे.


दुखापत झाल्यानंतर पृथ्वी शॉ त्यातून तंदुरुस्त होण्याकडे लक्ष देत नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच त्याला इतर युवा खेळाडूंप्रमाणे काही वाईट सवयी असल्याचेही म्हटले जात होते.


पृथ्वी शॉच्या अशा वागण्याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला समजावून सांगितले होते. याबद्दल स्वत: पृथ्वीने माहिती दिली होती.


आता मात्र पृथ्वीने या सर्व गोष्टींचे खंडण केले आहे. चुकीच्या वर्तनामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून त्याला परत पाठवल्याच्या वृत्ताला त्याने फेटाळून लावले आहे.


सराव करताना झालेल्या जखमी झालेल्या पृथ्वीला तिसऱ्या कसोटीत खेळता येईल अशी चर्चा होती. मात्र, त्याला मायदेशात परत पाठवण्यात आले होते.


पृथ्वीचे लक्ष खेळावर नसून दुसऱीकडेच असल्याची चर्चा झाली होती. मात्र, या सर्व अफवा असून मी याकडे लक्ष देत नाही असे पृथ्वी शॉने सांगितले.


मला तेव्हा कोणीही मी मेहनत करत नसल्याचे सांगितले नाही. माझी खेळण्याची इच्छा होती पण दुखापत झाली होती असे पृथ्वी म्हणाला.