इंडियन प्रीमियर लीगच्या 12 व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने विराट कोहलीच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली होती. कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीवर गंभीरने खोचक टीका केली होती.
2/ 6
शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात गंभीरने विराटवर केलेले काही आरोपात तथ्य असल्याचंच जाणवलं. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात कोहलीच्या बेंगळुरु संघाला दारुण पराभव पत्करावा लागला.
3/ 6
पहिल्यांदा फलंदाजी करताना बेंगलोरचा संघ फक्त 70 धावा करु शकला. त्यांच्याकडचे विराट कोहली, डीव्हिलियर्स यांच्यासारखे दिग्गज फलंदाजही ढेपाळले. त्यामुळेच चेन्नईने 7 विकेटने सामना जिंकला.
4/ 6
कर्णधार म्हणून कोहलीला चेन्नईच्या मैदानाचा अंदाज घेता आला नाही. चेन्नईचे मैदान फिरकीला मदत करणारे असताना त्याने संघात 5 मध्यमगती गोलंदाजांना खेळवले.
5/ 6
बेंगळुरु संघात शिवम दुबे, नवदीप सैनी, उमेश यादव मोहम्मद सिराज हे गोलंदाज होते. तर चेन्नईकडे जडेजा, हरभजन सिंग, इम्रान ताहिर हे फिरकीपटू होते.
6/ 6
गौतम गंभीरने विराट कोहली हुशार कर्णधार नसल्याचे म्हटले होते. तसेच त्याच्याकडे सामन्याची रणनिती आखण्याचं कौशल्य नाही असंही त्याने म्हटलं होतं.