Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


आयपीएलमधील हाय व्होल्टेज सामना मुंबईतील वानखेडेवर रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आज एकमेकांना भिडतील. दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
2/ 5


चेन्नईने पहिल्या तीनही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांना मुंबई इंडियन्स टक्कर देऊ शकते. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा चेन्नईच्या संघाची डोकेदुखी ठरू शकतो.
3/ 5


चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आतापर्यंत रोहित शर्माचे रेकॉर्ड चांगले आहे. रोहितने चेन्नई विरुद्ध 23 सामन्यात 606 धावा केल्या आहेत. विराटनंतर चेन्नई विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा दुसरा फलंदाज आहे.
4/ 5


वानखेडेवर तर रोहित शर्माने चेन्नईच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली आहे. त्याने 206 चेंडूत 289 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 140 पेक्षा जास्त आहे. आता रोहित शर्माला रोखण्याचे आव्हान चेन्नईसमोर असेल.