दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाला आता नव्यानं रणनीती तयार करावी लागणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात पुढच्या महिन्यात वन-डे आणि टी20 मालिका होणार आहे. या मालिकेत देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या 2 फिनिशर्सच्या समावेशासाठी हेड कोच राहुल द्रविड (Rahaul Dravid) आग्रह करू शकतो.
ऋषी धवननं 2016 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याला 3 वन-डे आणि 1 टी20 इंटरनॅशनल खेळण्याचा अनुभव आहे. दोन्ही प्रकारात त्याने आजवर प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. विजय हजारे स्पर्धेत 17 विकेट्स आणि 458 रन करत त्यानं टीम इंडियातील जागेवर दावेदारी सादर केली आहे.