भारताचा हिटमॅन रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा रोहित शर्मा अपघाताने फलंदाज झाला आहे.
2/ 5
रोहित शर्माने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला एक गोलंदाज म्हणून सुरुवात केली होती. रोहित शर्मा भारताच्या ज्युनिअर संघात क्रिकेट खेळत होता.
3/ 5
2005 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर असताना रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला गोलंदाजी करता येत नव्हती. त्यावेळी गोलंदाज म्हणून त्याची कारकिर्द संपुष्टात आली.
4/ 5
गोलंदाजी करायला अडचण आल्यानंतर रोहितने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं. त्यानंतर मात्र, रोहितने मागे वळून पाहिलं नाही.
5/ 5
भारताकडून क्रिकेटच्या तीनही प्रकारात शतक करणाऱ्यांमध्ये रोहित शर्माचा समावेश आहे. त्याच्याशिवाय अशी कामगिरी केवळ सुरेश रैना आणि केएल राहुल यांनी केली आहे.