भारताने पहिला आंतरराष्ट्रीय टी 20 सामना 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. यात 6 विकेटनं विजय मिळवला होता. धोनी शून्यावर तर दिनेश कार्तिक 31 धावांवर नाबाद राहिला होता. त्यानंतर भारताने आतापर्यंत 115 सामने खेळले असून 71 वेळा विजय मिळवला आहे. 41 सामन्यात पराभव झाला असून 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. यामध्ये काही खेळाडू असे आहेत ज्यांचा पहिला टी20 सामना अखेरचा टी20 सामना ठरला.
भारतीय संघात द वॉल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने 31 ऑगस्ट 2011 ला भारतीय संघात टी20 मध्ये पदार्पण केले. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात भारताला 6 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. द्रविडने 21 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. यात एकाच षटकात सलग तीन षटकारही मारले होते. त्यानंतर राहुल द्रविडने एकही आतंरराष्ट्रीय टी20 सामना खेळला नाही.