विराटला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर तो पहिल्यांदा एखादा सामना खेळत आहे. वन-डे टीमच्या कॅप्टनपदी रोहित शर्माची (Rohit Sharma) नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित दुखापतीमुळे ही मालिका खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) टीमचा कॅप्टन आहे. (AFP)
वन-डे क्रिकेटमध्ये देशाबाहेर सर्वाधिक रन करण्याच्या रेकॉर्डची संधी विराटला आहे. त्याने पहिल्या मॅचमध्ये 9 रन केल्यास देशाबाहेर सर्वाधिक रन करणारा तो भारतीय बॅटर बनेल. सध्या हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. सचिननं वन-डे क्रिकेटमध्ये देशाबाहेर 12 शतक आणि 24 अर्धशतक झळकावली आहेत. (BCCI Twitter)