स्मृती मंधाना 2017 वन-डे वर्ल्ड कप आणि 2020 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपच्या टीम इंडियाची सदस्य आहे. या दोन्ही स्पर्धेतील टीम इंडियाच्या फायनलपर्यंतच्या प्रवासात स्मृतीचे मोलाचे योगदान आहे. ती ऑस्ट्रेलियातील टी20 लीग बिग बॅश लीगमध्ये खेळली आहे. तसेच इंग्लंडमध्ये होणाऱ्या ‘द हंड्रेड’ या लीगसाठी देखील तिची निवड झाली आहे. (Smriti Mandhana Instagram)
स्मृती मंधानानं 59 वन-डेमध्ये 42 च्या सरासरीनं 2253 रन काढले आहेत. यामध्ये 4 शतक आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जास्त रन काढणाऱ्या टॉप पाच जणींमध्ये तिचा समावेश आहे. स्मृतीनं टी20 क्रिकेटमध्ये 81 मॅचमध्ये 26 च्या सरासरीनं 1901 रन काढले आहेत. यामध्ये 13 अर्धशतकांचा समावेश आहे. या प्रकारात भारताकडून सर्वाधिक रन करण्याच्या यादीमध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिने 3 टेस्टमध्ये 2 अर्धशतकं झळकावली आहेत. (Smriti Mandhana Instagram)