मुंबई, 20 जून : आज जगभर फादर्स डे (Father’s Day) साजरा केला जात आहे. या निमित्तानं सर्व जण त्यांच्या आयुष्यातील वडिलांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत. क्रिकटपटूंनीही हा दिवस साजरा केलाय. यावेळी टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अफगाणिस्तानचा बॉलर राशिद खान (Rashid Khan) हे इमोशनल झाले. या दोघांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे.
राशिद खाननं वडिलांचा फोटो शेअर करुन वडिलांचा मार्गदर्शक हाथ नेहमी माझ्या खांद्यावर असेल, अशी भावना व्यक्त केली आहे. तर हार्दिक पांड्यानं भाऊ कृणाल पांड्यासह वडिलांचा फोटो शेअर केला आहे. वडिलांनी आम्हाला कर्तव्याबाबत शिकवलं. त्यांचे प्रेम आणि मार्गदर्शनामुळेच आम्ही इथवर आलो आहोत असं हार्दिक म्हणाला.