Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


सध्या फॉर्ममध्ये असलेल्या वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने आणखी एक वादळी खेळी केली आहे. इंग्लंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात गेलने 27 चेंडूत 77 धावा केल्या.
2/ 6


इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 113 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडिजने हे आव्हान अवघ्या 12.1 षटकांत पूर्ण केले.
3/ 6


ख्रिस गेलने केलेल्या खेळीच्या जोरावरच हा सामना विंडिजने जिंकला. गेलने 27 चेंडूत 5 चौकार आणि 7 षटकारांच्या सहाय्याने 77 धावा केल्या.
4/ 6


गेलने त्याच्या खेळीत फक्त 19 चेंडूत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या सहाय्याने अर्धशतक केले. विंडीजकडून हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.
5/ 6


याआधीचा विक्रम डॅरेन सॅमीच्या नावावर होता. त्याने 2010 आणि 2012 मध्ये अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 चेंडूत अर्धशतक केले होते.