

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून गूड न्यूज दिली आहे. रहाणेची पत्नी राधिका प्रेग्नंट असून त्याने इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर केला आहे.


अजिंक्य रहाणे आणि राधिका यांनी 26 सप्टेंबर 2014 मध्ये लग्न केलं. वर्ल्ड कपदरम्यान रहाणे विम्बल्डन स्पर्धा पहायला गेला होता. त्याचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.


भारतीय संघाचा कसोटीतला माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची वर्ल्ड कपमध्ये निवड करण्यात आली नव्हती. विंडीज दौऱ्यातही त्याची फक्त कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.


वर्ल्ड कपवेळी रहाणे इंग्लंडमध्ये क्वाऊंटी क्रिकेट खेळत होता. त्याचे टेनिस कोर्टवरचे फोटो व्हायरल झाले होते.


रहाणे आपल्या पत्नीसोबत Wimbledon Final पाहायला गेला होता. यावेळी त्याच्या पत्नीनं रॉजर फेडरर खेळत असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. दरम्यान याचवेळी इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप फायनल सामना सुरु होता.


या सामन्यासाठी रहाणे, पत्नी आणि मित्र परिवारासोबत उपस्थित होता. दरम्यान त्याचा या फोटोवरून चाहत्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती.


रहाणेच्या Wimbledon Final दरम्यानच्या फोटोवर तुला क्रिकेटची आठवण येत नाही का, अशा कमेंट केल्या आहेत. त्यानंतर रहाणेला विंडीज दौऱ्यावर वनडे संघात संधी मिळेल असं वाटत होतं. मात्र, त्याला स्थान मिळालं नाही.