

इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी सज्ज झालाय. आशिया चषकासाठी भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. विराट कोहलीला विश्रांती देऊन रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आलंय. त्याचबरोबर संघात अजून एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. तो म्हणजे खलील अहमद मुश्ताक अली.


अवघ्या 20 वर्षांचा खलील या आधी 2018 च्या आयपीएलमध्ये सनराइजर्स हैदराबादकडून खेळला आहे. आयपीएल नंतर त्याने आता आशिया चषकाच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीयमध्ये डेब्यू केलाय.


राजस्थानमधील छोट्याश्या गावातून आलेल्या एका मध्यमवर्गीय मुलासाठी भारतीय संघात निवड होणं सोपी गोष्ट नव्हती. सुरूवातीला आर्थिक परिस्थितीमुळे कुटूंबीय त्याच्या क्रिकेट खेळण्याच्या विरोधात होते. त्याचे वडील हे हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर होते त्यामुळे त्यांना खलीलला डॉक्टर बनवायचं होतं. पण, खलीलला मात्र क्रिकेटमध्ये रस होता.


खलीलच्या प्रशिक्षकांनी त्याच्या वडिलांना समजावले. प्रशिक्षकांनी समजावल्यावर त्यांनी खेळण्यास परवानगी दिली. त्यानंतर कष्ट करू त्याने भारतीय संघात स्थान मिळवलं.


2016 मध्ये झालेल्या 19 वर्षाखालील विश्व चषकात त्याने खलीलने अफलातून कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे आयपीएलमध्ये सनराइजर्स हैदराबादने त्याला 3 कोटी रुपयांत विकत घेतलं. आतापर्यंतच्या त्याच्या परफॉर्मन्समुळे आशिया चषकात खेळण्याची संधी त्याला मिळाली. या संधीचं सोनं खलील करतो की नाही हे येत्या सामन्यांमध्ये दिसेलच.