

आयपीएल (IPL 2020) गाजवल्यानंतर क्रिस गेल (Chris Gayle) आता ऐन दिवाळीमध्ये नवा धमाका करण्यासाठी सज्ज आहे. 22 यार्डाच्या खेळपट्टीवर युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेला क्रिस गेल त्याच्या मैदानाबाहेरच्या गोष्टींमुळेही कायम चर्चेत असतो. आता दिवाळीमध्येही गेल त्याच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट देणार आहे.


आयपीएलमध्ये पंजाब (KXIP)च्या टीमकडून खेळणाऱ्या क्रिस गेलचं पंजाबी व्हिडिओ सॉन्ग दिवाळीच्या दिवशीच रिलीज होणार आहे. (फोटो सौजन्य अवीना शाह इन्स्टाग्राम)


क्रिस गेलच्या या व्हिडिओ सॉन्गचं नाव ग्रुव्ह द पंजाबी रिमिक्स असं आहे. या गाण्याची संगीतकार आणि गायक अवनी शाह आहे. अवनी शाह ही ब्रिटीश-भारतीय गायिका आहे.


याआधीही क्रिस गेल अनेक व्हिडिओ सॉन्गमध्ये दिसला होता. ग्रुव्ह गाण्यासाठी गेलने स्वत:चा आवाजही दिला आहे. या गाण्यात तो रॅपिंग करताना दिसणार आहे. या गाण्यात चाहत्यांना हिंदी, पंजाबी आणि जमैकाचे रंग चाहत्यांना दिसतील. (फोटो सौजन्य गेल इन्स्टाग्राम)


41 वर्षांच्या क्रिस गेलने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. पंजाबकडून खेळताना त्याने 7 मॅचमध्ये 41.14 च्या सरासरीने 288 रन केले होते, यामध्ये 3 अर्धशतकांचाही समावेश होता. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये गेलचं शतक फक्त एका रनने हुकलं होतं. जोफ्रा आर्चरने गेलला 99 रनवर आऊट केलं होतं. (फोटो @lionsdenkxip/Twitter)