

टी-20 क्रिकेटमधील सगळ्यात यशस्वी बॅट्समन क्रिस गेल (Chris Gayle) याने लंका प्रीमियर लीग (LPL) मधून माघार घेतली आहे. गेलसोबतच इंग्लंडचा फास्ट बॉलर लियाम प्लंकेट आणि पाकिस्तानचा सरफराज अहमदही ही स्पर्धा खेळणार नाही. त्यामुळे एलपीएलला सुरु होण्याआधीचम मोठा धक्का बसला आहे. गेल आणि प्लंकेट यांनी आपण खेळणार नसल्याची माहिती कॅन्डी टस्कर्सच्या टीमला दिली आहे. (फोटो- KXIP)


क्रिस गेलने लंका प्रीमियर लीगमधून माघार का घेतली, याच कारण त्याने किंवा टीमनेही दिलेलं नाही. क्रिस गेल आणि लियाम प्लंकेट यावर्षी एलपीएल खेळणार नाही, हे सांगताना आम्हाला दु:ख होत आहे, असं कॅन्डी टस्कर्सच्या टीमने सांगितलं.


गेल आणि प्लंकेट यांच्या एक दिवस आधी पाकिस्तानचा सरफराज अहमद यानेही स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. सरफराज अहमद एलपीएलमधल्या गॉल ग्लेडिएटर्स टीमचा कर्णधार होता, त्यामुळे टीमपुढे आता मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.