

ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. अनेकवेळा वॉर्नर त्याची पत्नी कॅन्डिस आणि दोन मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेयर करतो. वॉर्नरने लॉकडाऊनमध्ये त्याच्या कुटुंबासोबत बनवलेले टिकटॉक व्हिडिओही व्हायरल झाले होते. वॉर्नरने पाच वर्षांपूर्वी एप्रिल महिन्यात केन्डिसशी लग्न केलं होतं. आता कॅन्डिसने डेव्हिड वॉर्नरसोबतच्या आपल्या सेक्स लाईफबाबत खुलासे केले आहेत.


कॅन्डिसने KIIS FM वर काईल आणि जॅकी ओ यांच्या शोमध्ये वैयक्तिक आयुष्याबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या. या कार्यक्रमात कॅन्डिसला खेळाडूंच्या सेक्स लाईफबाबत प्रश्न विचारण्यात आले. अनेक फूटबॉलपटू मॅचच्या आधी सेक्स पासून लांब राहतात, क्रिकेटपटूही असंच करतात का? असा प्रश्न कॅन्डिसला विचारण्यात आला. (फोटो- कॅन्डिस वॉर्नर इन्स्टाग्राम)


कार्यक्रमात कॅन्डिसला क्रिकेटपटूही फूटबॉलपटूंसारखंच करतात का ते वेगळे असतात? असं विचारण्यात आलं. यावर कॅन्डिसने या गोष्टी प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असल्याचं सांगितलं. (फोटो- कॅन्डिस वॉर्नर इन्स्टाग्राम)