

आयपीएल (IPL 2020) चा 13वा मोसम कोरोना व्हायरसमुळे यावर्षी युएईमध्ये खेळवण्यात आला. प्रेक्षकांशिवाय झालेल्या या स्पर्धेत अनेक युवा क्रिकेटपटूंनी त्यांची प्रतिभा दाखवली, तर अनेक दिग्गज नावं सपशेल अयपशी ठरली. (CSK, KXIP, KKR/Twitter)


ऋषभ पंत : दिल्ली कॅपिटल्सचा विकेट कीपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) यंदाच्या आयपीएलमध्ये फिटनेस आणि फॉर्मसाठी संघर्ष करताना दिसला. आपल्या नेहमीच्या फटकेबाजीसाठी ओळख असलेल्या पंतला यावर्षी मोठे शॉट मारता आले नाहीत. पंतला 14 मॅचमध्ये फक्त 343 रन करता आले, यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता. (Delhi Capitals/Twitter)


एमएस धोनी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या एमएस धोनी (MS Dhoni) याने चाहत्यांची निराशा केली. धोनीने संपूर्ण स्पर्धेत धोनीने 25 च्या सरासरीने 200 रन केले, यामध्ये एकही अर्धशतक नव्हतं. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईच्या टीमला प्ले-ऑफ गाठता आली नाही. (CSK/Twitter)


दिनेश कार्तिक : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्यासाठी हे वर्ष गोंधळातलं होतं. कोलकात्याने अर्ध्या मोसमातच कार्तिककडून इयन मॉर्गनकडे नेतृत्व दिलं. कार्तिकने या मोसमात 14 मॅचमध्ये 169 रन केले. कार्तिकसाठी हा तिसरा सगळ्यात खराब मोसम राहिला. (KKR/Twitter)


ग्लेन मॅक्सवेल : ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला पंजाबच्या टीमने मोठी किंमत देऊन विकत घेतलं होतं. पण मॅक्सवेलने मात्र पंजाबची घोर निराशा केली. मॅक्सवेलने आयपीएलआधी इंग्लंडविरुद्ध शतक केलं होतं, पण आयपीएलमध्ये तो अपयशी ठरला. संपूर्ण आयपीएलमध्ये मॅक्लवेलला फक्त एक सिक्स मारता आली. 14 मॅचमध्ये त्याने 108 रन केले, तर 9 फोर मारले. (KXIP/Twitter)


आंद्रे रसेल : धमाकेदार बॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेला आंद्रे रसेल (Andre Russell) देखील यावर्षी सुपर फ्लॉप ठरला. या मोसमात रसेल दुखापतीमुळेच हैराण होता. कोलकात्याकडून खेळताना रसेलने 10 मॅचमध्ये फक्त 117 रन केले. त्याची सरासरी 13 रन एवढी कमी होती. या मोसमात रसेलला एकही अर्धशतक करता आलं नाही. केकेआरच्या खराब कामगिरीसाठी रसेलचा फॉर्मही मुख्य कारण ठरलं. (KKR/Twitter)