झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि विकेट कीपर ब्रॅण्डन टेलर (Brendon Taylor Retired) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयर्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजच्या तिसऱ्या मॅचमध्ये 7 रन करून टेलर आऊट झाला. यानंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अंत झाला. आयर्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजआधीच टेलरने आपण निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती.
झिम्बाब्वेच्या या खेळाडूमध्ये टॅलेंटची कमी नव्हती, पण त्याला कायमच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. 2015 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेचं नेतृत्व करणाऱ्या टेलरला प्रत्येक मॅचसाठी फक्त 13 हजार रुपये मिळत होते. तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताचे खेळाडू प्रत्येक मॅचसाठी लाखो रुपये कमवत होते. तरीही त्याने 2015 वर्ल्ड कपच्या 6 मॅचमध्ये 72.16 च्या सरासरीने 433 रन केले, यात 2 शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश होता.