ब्राझीलमध्ये गेल्या काही काळापासून क्रिकेट (Cricket in Brazil) प्रचंड लोकप्रिय होत आहे, त्यामुळे तिकडे बॅटचाही तुटवडा जाणवायला लागला. ब्राझीलमधल्या लोकांची ही गरज लक्षात घेऊन इंग्लंडमधले हौशी क्रिकेटपटू मॅट फेदरस्टोन (Matt Featherstone) यांनी ब्राझीलमध्येच बॅटचं उत्पादन करायला सुरुवात केली. मॅट फेदरस्टोन हे सध्या क्रिकेट ब्राझीलचे अध्यक्ष आहेत. बॅट बनवण्यासाठी फेदरस्टोन यांनी सुतारकाम करणाऱ्या लुईझ रॉबेर्टो फ्रॅन्सिस्को (Luiz Roberto Francisco) यांची भेट घेतली आणि बॅट बनवण्यासाठी लागणारं इंग्लिश लाकूड किंवा तशाच प्रकारचं एखादं लाकूड आहे का, याची विचारणा केली. (Image: Reuters)
मध्य ब्राझीलमधलं छोटं शहर असलेलं पोकोस डे कॅलडस (Pocos de Caldas) हे शहर ब्राझील क्रिकेटचं माहेरघर झालं आहे. फ्रॅन्सिस्को सुरुवातीला खुर्ची आणि कपाटं बनवायचे, पण बॅट बनवण्यासाठी त्यांनी खूप वेळ दिला, सुरुवातीला त्यांना खूप त्रास झाला आणि संयमही ठेवायला लागला. बॅटचं हॅण्डल बनवणं, त्याच्या कडा बनवणं, त्यासाठी योग्य लाकूड वापरणं आणि यंत्राचा योग्य वापर करणं, यात खूप अडचणी आल्या. सुरुवातीला आपल्याया हे काम जमणार नाही, असं वाटलं, अनेकवेळा मी रात्रभर जागलो, पण आपण यातूनच शिकतो. उपाय सापडत नव्हता, तोपर्यंत मला झोप लागत नव्हती, पण इच्छा असेल तिकडे मार्ग असतोच, असं फ्रॅन्सिस्को म्हणाले. (Image: Reuters)
पोकोस डे कॅलडस या शहरात 5 हजार मुलांना 50 पेक्षा जास्त शाळांमध्ये क्रिकेट शिकवलं जात आहे. शाळांमध्ये टी-10 किंवा टी-20 क्रिकेट खेळवलं जातं. 21 वर्षांपूर्वी फेदरस्टोन ब्राझीलला आले, त्यानंतर त्यांनी इथल्या महापौरांना क्रिकेटसाठी दोन ट्रेनिंग सेटंर बांधायला तयार केलं. या ट्रेनिंग सेंटरमध्ये आता नेट आणि बॉलिंग मशिनही आहे, ज्यामुळे मुलांना क्रिकेटचे धडे गिरवणं सोपं झालं आहे. (Image: Reuters)
सुरुवातीला इंग्लंडमध्ये वापरल्या गेलेल्या बॅट, पॅड आणि बॉल लॉर्ड्स टॅव्हर्नर्स या युकेच्या संस्थेने ब्राझीलला पुरवल्या, पण ब्राझीलमधली मुलं यॉर्कर, स्क्वेअर ड्राईव्ह, सिली मिड-ऑफ या क्रिकेटच्या गोष्टी शिकू लागली. तसंच कोरोनामुळे वस्तू युकेमधून ब्राझीलमध्ये आणणंही कठीण होऊ लागलं, त्यामुळे यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज होती. '15-20-30 बॅट ठराविक मुलांसाठी आणणं सोपं होतं, पण आता 5 हजारांपेक्षा जास्त मुलं क्रिकेट खेळत आहेत. कोरोना संपल्यानंतर हीच संख्या 33 हजारांवर जाईल, अशा परिस्थितीमध्ये बॅट किंवा क्रिकेट खेळण्यासाठी लागणारं सामान परदेशातून आणणं अशक्य आहे, त्यामुळेच आम्ही स्वत:चा कारखाना काढायचा निर्णय घेतला,' असं फेदरस्टोन म्हणाले. (Image: Reuters)
ब्राझीलमधले टॉप खेळाडू अजून आयात केलेल्या बॅट वापरतील, पण लहान मुलांना फ्रॅन्सिस्को यांच्या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या बॅट मोठ्या प्रमाणावर देण्यात येतील. लेग साईडच्या बॉलवर 270 डिग्री मध्ये मारलेला बॉल ब्राझिलीयन शॉट म्हणून इकडे प्रसिद्ध झाला आहे. जगातल्या सर्वाधिक झाडांच्या जाती असलेल्या ब्राझीलमध्ये इंग्लिश लाकडापेक्षा उत्कृष्ट बॅट बनवण्याचं आव्हान आता फेदरस्टोन यांच्यापुढे आहे. (Image: Reuters)