संधीचा अभाव आणि मोठा क्रिकेटपटू व्हायच्या इच्छेमुळे दोन देशांकडून क्रिकेट खेळणारे अनेक खेळाडू सध्याच्या क्रिकेट विश्वात आपण पाहत आहोत. दोन देशांकडून क्रिकेट खेळण्याचं प्रमाण इंग्लंडमध्ये सर्वाधिक आहे. यातलाच एक क्रिकेटपटू म्हणजे बॉईड रॅन्किन (Boyd Rankin). आयर्लंड आणि इंग्लंडकडून खेळलेल्या बॉईड रॅन्किन याने शुक्रवारी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 6 फूट 8 इंच उंच असलेल्या या फास्ट बॉलरने आपल्या करियरमध्ये 73 वनडे, 50 टी-20 आणि 3 टेस्ट खेळल्या. रॅन्किनने आयर्लंडकडून वनडे आणि टी-20 मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर इंग्लंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.