

भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रानं 11 ऑगस्ट 2008मध्ये नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकत सर्व भारतीयांचे मन जिंकले. अभिनव बिंद्रामुळं पहिल्यांदाच भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकता आले.


अभिनव बिंद्राचा बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचा प्रवास सोपा नव्हता. खुप कमी लोकांना माहित आहे की बिंद्रा नेमबाजी करताना चष्मा लावायचा.


ऑलिम्पिक स्पर्धेच्या 2 वर्षांआधी बिंद्राला मोठी दुखापत झाली होती. 2006मध्ये बिंद्राच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. त्याची दुखापत एवढी खतरनाक होती की, त्याचे करिअस संपणार होते.


ऑलिम्पिक स्पर्धेआधी बिंद्रानं आपल्या आरोग्यावर प्रचंड कष्ट घेतले. त्यानंतर बीजिंगमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याला सुवर्ण पदक जिंकता आलं.


बिंद्रानं आपल्या करिअरमध्ये नेमबाजीत भारताचा झेंडा अटकेपार रोवला आहे. त्यानं 14 वर्षांच्या वयात राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण केले होते. 2001मध्ये म्युनिख शुटिंग वर्ल्ड कपमध्ये रौप्य पदक जिंकले होते.