अजिंक्य रहाणेने विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय टेस्ट टीमचं उल्लेखनीय नेतृत्व केलं आहे. रहाणेच्या नेतृत्वात भारतीय टीमने मेलबर्नमध्ये शानदार विजय मिळवला. याशिवाय खेळाडूंना दुखापती झाल्या असतानाही सिडनी टेस्ट ड्रॉ करण्यात भारताला यश आलं. या कामगिरीचा इनाम रहाणेला मिळू शकतो. तो सध्या ग्रेड-ए मध्ये असल्यामुळे प्रमोशन होऊन A+ मध्ये जागा मिळण्याची संधी आहे. (Photo-AP)