

बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने मागच्या काही महिन्यांमध्ये तब्बल 22 वेळा कोरोना टेस्ट केली. खुद्द सौरव गांगुलीनेच याबद्दल खुलासा केला. मागच्या साडेचार महिन्यांमध्ये आपण 22 वेळा कोरोना टेस्ट केल्याचं गांगुली म्हणाला. (Photo Sourav Ganguly Instagram)


बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आयपीएलच्या 13 व्या मोसमानिमित्त 19 सप्टेंबरपासून 10 नोव्हेंबरपर्यंत युएईमध्ये होता. (Photo Sourav Ganguly Instagram)


लिविंगार्ड एजी या ब्रॅण्डच्या दूत म्हणून सौरव गांगुली ऑनलाईन मीडिया कॉन्फरन्ससाठी आला होता, त्यावेळी गांगुलीने ही माहिती दिली. 22 वेळा कोरोना टेस्ट केल्यानंतर आपण एकदाही कोरोना पॉझिटिव्ह आलो नसल्याचं, गांगुलीने सांगितलं. (Photo Sourav Ganguly Instagram)


गांगुलीच्या आसपासचे लोक कोरोना पॉझिटिव्ह आले होते, त्यामुळेच गांगुलीला कोरोना टेस्ट करावी लागली. (Photo Sourav Ganguly Instagram)