भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये होणाऱ्या दोन टेस्टसाठी प्रेक्षकांचं स्टेडियममध्ये पुनरागमन होऊ शकतं. याशिवाय पुण्यात होणाऱ्या वनडे सीरिजसाठीही स्टेडियममध्ये प्रेक्षकांना एन्ट्री मिळू शकते. बीसीसीआयने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.(@GCAMotera/Twitter)
टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार अहमदाबाद आणि पुण्याच्या स्टेडियममध्ये दर्शक येऊ शकतील, असा विश्वास बीसीसीआयला आहे. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये शेवटच्या दोन टेस्ट आणि पाच टी-20 मॅच होणार आहेत. तर पुण्यात भारत-इंग्लंडमध्ये 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. यासाठी बीसीसीआयने दोन्ही क्रिकेट संघांशी चर्चा सुरू केली आहे. आरोग्य विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रेक्षकांना स्टेडियममधून मॅच पाहता येईल, असं बीसीसीआयचा वरिष्ठ अधिकारी म्हणाला आहे.
पहिल्या दोन टेस्ट मॅचसाठी भारत आणि इंग्लंडची टीम चेन्नईमध्ये पोहोचली आहे. दोन्ही टीम सध्या बायो-बबलमध्ये आहेत. भारतीय टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मादेखील बायो-बबलमध्ये गेले आहेत. दोन्ही टीम पाच दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये असतील. मॅचच्या आधी फक्त तीन दिवस दोन्ही टीमना सरावाची संधी मिळणार आहे.