

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला 17 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. भारताची घराबाहेरची ही पहिलीच डे-नाईट टेस्ट मॅच असणार आहे, जी गुलाबी बॉलने खेळवली जाईल. सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारताकडे आहे, कारण त्यांनी मागच्यावेळी ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला होता. ही ट्रॉफी पुन्हा मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया कोणतीही कसर सोडणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये स्टीव्ह स्मिथचं पुनरागमन झालं असलं तरी ऍडलेड टेस्टमध्ये त्यांना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. (BCCI/Twitter)


ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरला सिडनीतल्या दुसऱ्या वनडेवेळी दुखापत झाली, त्यामुळे तो पहिल्या टेस्टपर्यंत खेळू शकणार नाही. 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टसाठी वॉर्नर उपलब्ध असेल. सध्या आपण फिट नाही, मैदानात उतरायला आणखी 10 दिवस लागतील, असं वॉर्नरने सांगितलं आहे. (David Warner/Instagram)


ऑस्ट्रेलियाचा आणखी एक प्रतिभाशाली बॅट्समन विल पुकोवस्कीदेखील पहिली मॅच खेळणार नाही. भारताविरुद्धच्या सराव सामन्यात पुकोवस्कीच्या डोक्याला बॉल लागला. पहिल्या टेस्टमध्ये पुकोवस्की जो बर्न्ससोबत इनिंगची सुरूवात करणार होता. सराव सामन्यात कार्तिक त्यागीने टाकलेला बॉल पुकोवस्कीच्या हेल्मेटला लागला, यानंतर तो मैदानाबाहेर गेला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुकोवस्कीला पहिल्या टेस्टमधून बाहेर ठेवलं आहे. (@cricketcomau/Instagram)


ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन भारताविरुद्ध पहिली टेस्ट मॅच खेळेल, असं सांगितलं जात होतं. सराव सामन्यात ग्रीनने शतक केलं होतं, पण जसप्रीत बुमराहने मारलेला बॉल ग्रीनच्या डोक्याला लागला, ज्यामुळे ग्रीनही पहिल्या टेस्टमध्ये खेळणार नाही. (@cricketcomau/Instagram)