

भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 2-1ने पराभव झाला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये मोठे बदल होतील, असं बोललं जाऊ लागलं आहे. भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाची बॅटिंग अपयशी ठरली. त्यामुळे भविष्यात टेस्ट मॅचसाठी मधल्या फळीत नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. काहींनी तर ऑस्ट्रेलियाने आक्रमक बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याची टेस्ट टीममध्ये निवड करण्याची मागणी केली आहे.


एकीकडे ही मागणी होत असतानाच मॅक्सवेलने मात्र आपली टेस्ट कारकिर्द संपल्यात जमा असल्याचं वक्तव्य केलं आहे. आता माझं लक्ष्य वनडे आणि टी-20 क्रिकेटवर आहे, कारण या तीन वर्षात तीन वर्ल्ड कप होणार आहेत, असं मॅक्सवेल म्हणाला. मॅक्सवेल ऑस्ट्रेलियासाठी 7 टेस्ट मॅच खेळला. 2017 साली बांगलादेशविरुद्ध त्याने शेवटची टेस्ट खेळली होती. (Photo- Maxwell Instagram)


भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये कांगारूंची मधली फळी अपयशी ठरली असली तरी मॅक्सवेलला टेस्ट टीममध्ये पुनरागमनाची अपेक्षा नाही. (Photo- Maxwell Instagram)


हेराल्ड सन वृत्तपत्राशी बोलताना मॅक्सवेल म्हणाला, 'मी टेस्ट टीममध्ये पुनरागमनाच्या जवळपासही नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेटला काय हवं आहे, ते मला माहिती आहे. त्यांच्याकडे चांगले प्रथम श्रेणी खेळाडू आहेत. कॅमरून ग्रीन सुपरस्टार होणार आहे. पुकोवस्की आहे, ट्रॅव्हिस हेडची सरासरी टेस्टमध्ये 40ची आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत.' (Photo- Maxwell Instagram)


मॅक्सवेलला 2021, 2022 साली होणाऱ्या दोन टी-20 वर्ल्ड कपमध्ये आणि 2023 सालच्या 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी करायची आहे. मॅक्सवेलने 2013 साली भारताविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, त्याचं एकमेव टेस्ट शतकही भारताविरुद्ध 2017 साली झालं आहे. (Photo- Maxwell Instagram)