

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019मध्ये भारताला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्याच मतभेद असल्याच्या चर्चा वाढू लागल्या.


याआधी विराट कोहलीचे कर्णधारपद काढून रोहित शर्माला द्यावे, अशी मागणी जोर धरत होती. आता मात्र रोहित-विराट यांच्यातील मतभेद टोकाला गेले असल्याची माहिती मिळत आहे.


प्रसिध्द झालेल्या बातम्यांनुसार, रोहित-विराट वर्ल्ड कपनंतर एकमेकांशी बोललेही नाही आहेत. दरम्यान आता रोहितनं विराटची पत्नी अनुष्का शर्माला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यामुळं आता या वादाला नवा रंग आला आहे.


रोहितनं यापूर्वी कोहलीलाही अनफॉलो केले होते.पण, कोहली इंस्टाग्रामवर अजूनही रोहितला फॉलो करतो. पण, रोहितची पत्नी कोहलीच्या फ्रेंड लिस्टमध्ये अजूनही नाही.


आता अनुष्का शर्मानं आपल्या इन्स्टाग्राम स्टेट्सवर, "एका बुद्धीमान व्यक्तीनं एकदाही काही मत व्यक्त केलेले नाही. फक्त खोट्यात अडकलेला खरेपणा हा या शांततेला तोडू शकतो", असे लिहत रोहित शर्मावर पलटवार केला आहे.