वेस्ट इंडिजचा स्टार ऑलराऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) सध्या अबु धाबीमध्ये पीएसएल (PSL) खेळत आहे. काहीच दिवसांपूर्वी मॅचमध्ये बॅटिंग करत असताना रसेलला दुखापत झाली, त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात न्यावं लागलं. आंद्रे रसेलसोबत ही घटना घडल्यानंतर त्याची पत्नी जेसिम लोरा चर्चेत आली आहे. (Mian Omer Twitter/Jassym LORA Russell instagram)
पीएसएलमध्ये क्वेट्टा ग्लॅडिएटर्स आणि इस्लामाबाद युनायटेड्सच्या सामन्यात आंद्रे रसेलच्या हेल्मेटवर मोहम्मद मुसाचा बॉल लागला होता. फिजियोने तपासणी केल्यानंतर रसेलला खेळण्याची परवानगी देण्यात आली पण पुढच्याच बॉलला तो आऊट झाला. यानंतर रसेलला मैदानातूनच स्ट्रेचरवर रुग्णालयात न्यावं लागलं. रसेल नसल्यामुळे क्वेट्टाने त्याच्याऐवजी नसीम शाह याला कनकशन सबस्टिट्यूट म्हणून खेळवलं.