कोलकाता नाईट रायडर्स (KKR)चा स्टार ऑलराऊंडर आंद्रे रसेल हा सध्या युएईमध्ये आयपीएल (IPL 2020) खेळत आहे. रसेलची टीम पॉईंट्स टेबलमध्ये टॉप-4 मध्ये असली तरी त्याला मात्र आतापर्यंत चमकदार कामगिरी करता आलेली नाही. खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे रसेलची पत्नी जैसिम लोराला ट्रोल करण्यात आलं. यानंतर ट्रोल करणाऱ्याला जैसिमनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं.
इन्स्टाग्रामवर जैसिम लोराने आपला एक फोटो पोस्ट केला होता. यावर आतिफ खान नावाच्या एका युजरने रसेलला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. जॅसिम प्लीज दुबईला जा, रसेल चांगल्या फॉर्ममध्ये नाही, असं तो यूजर म्हणाला. यानंतर जैसिम लोरानेही त्याला प्रत्युत्तर दिलं. आंद्रे रसेल चांगल्या फॉर्ममध्ये आहे, असं जैसिम म्हणाली.