शुभमन नव्हे तर न्यूझीलंडच्या अमेलियाने केलंय सर्वात कमी वयात द्विशतक
भारताचा शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला. पण महिला आणि पुरुष अशा दोन्हीत हा विक्रम न्यूझीलंडची महिला क्रिकेटर अमेलिया केर हिच्या नावावर आहे.
न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने द्विशतक करताना 208 धावा केल्या. त्याने वयाच्या 23 व्या वर्षी अशी कामगिरी केली. पण महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंमध्ये याबाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
2/ 7
न्यूझीलंडची क्रिकेटपटू अमेलिया केर ही पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात द्विशतक करणारी क्रिकेटर आहे.
3/ 7
अमेलियाने 2018 मध्ये आय़र्लंडविरुद्ध 232 धावा केल्या होत्या. तेव्हा तिचे वय फक्त 17 वर्षे 243 दिवस इतकं होतं.
4/ 7
अमेलिया केरचे आई-वडील दोघेही वेलिंग्टनकडून घरेलू क्रिकेट खेळत होते. मोठी बहिण जेस केर ही न्यूझीलंडकडून खेळलीय. तर आजोबा ब्रूस मरे हे न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेट खेळले आहेत.
5/ 7
एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात 200 धावा आणि 5 विकेट घेणारी ती एकमेव क्रिकेटर आहे. आयर्लंडविरुद्ध तिने फिरकी गोलंदाजी करताना 17 धावात 5 विकेट घेतल्या होत्या. न्यूझीलंडच्या ४४० धावांचा पाठलाग करताना आय़र्लंडचा संघ 135 धावात गुंडाळला होता.
6/ 7
अमेलियाने आतापर्यंत 59 एकदिवसीय आणि 55 टी20 सामने खेळले आहेत. वनडेत तिने 2 शतके आणि 6 अर्धशतके केली आहेत. याशिवाय 77 विकेटही घेतल्या आहेत.
7/ 7
महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंत 2 द्विशतके झाली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष यांच्यात पहिलं द्विशतक करण्याचा मानही महिला क्रिकेटपटूच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने 1997 मध्ये डेन्मार्कविरुद्ध 229 धावा केल्या होत्या.