सर्वात सुंदर आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूचा होणार घटस्फोट.
|
1/ 11
ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू एलिसा पेरीने (Ellyse Perry) लग्नाच्या पाच वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
2/ 11
एलिसा पेरीने 2015मध्ये प्रसिद्ध रग्बीपटू मॅट टोमुआशी विवाह केला होता. दोघांचे फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असत.
3/ 11
त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे चाहते हैराण झाले आहे. मात्र फेब्रुवारीमध्ये व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे दिसले होते.
4/ 11
फेब्रुवारी 2019मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवार्ड कार्यक्रमात एलिसा वेडिंग रिंग न घालता पोहचली होती.
5/ 11
एवढेच नाही तर एलिसानं यावर्षी बेलिंडा क्लार्क अवार्ड जिंकल्यानंतर आपल्या स्पीचमध्ये मॅटचे नाव घेतले नव्हते.
6/ 11
दोघांनी रविवारी एक निवेदन जारी करत, दोघांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
7/ 11
या निवेदनात, एकमेकांचा मान राखत आम्ही वेगळे होत आहोत. आम्हाला वाटतं की हा निर्णय आमच्यासाठी योग्य आहे. आम्ही कायम आमच्या नात्याबाबत प्रायव्हसी ठेवली आहे, त्यामुळे चाहत्यांनी आम्हाला स्पेस द्यावी.
8/ 11
पेरी आणि मॅट पहिल्यांदा 2013मध्ये कपल म्हणून सर्वांसमोर आले होते.
9/ 11
2013मध्ये पेरी आणि मॅट जॉन एल्स मेडल अवॉर्डमध्ये एकत्र हजर होते. त्यानंतर एका वर्षात त्यांनी साखरपुडा केला आणि 2015मध्ये लग्न केले.
10/ 11
एलिसा पेरी जगातील सर्वात सुंदर आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखली जाते.
11/ 11
सध्या एलिसा पेरी जगातील पहिल्या क्रमांकाची अष्टपैलू खेळाडू आहे.