टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) संपणार आहे. यानंतर आपण पुन्हा या पदासाठी अर्ज करणार नसल्याचं शास्त्री यांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर आता बीसीसीआयने नव्या कोचसाठी नावं शोधायला सुरुवात केली आहे. यामध्ये 5 दिग्गजांचा समावेश आहे, पण यातल्या एकाने कोच व्हायला नकार दिला आहे. (Ravi Shastri)
श्रीलंकेचा महान खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा मुख्य कोच महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) याला टीम इंडियाचा कोच करण्यासाठी बीसीसीआय आग्रही होती, पण खुद्द महेलानेच याला नकार दिल्याचं वृत्त आहे. जयवर्धनेला श्रीलंका टीमचं कोच बनायचं आहे, तसंच महेला टीम इंडियाचा कोच झाला तर त्याला मुंबई इंडियन्सचं प्रशिक्षकपद सोडावं लागेल. बीसीसीआयच्या नियमानुसार एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही.